Ad will apear here
Next
पुणे विभागीय आयुक्त, जिल्‍हाधिकाऱ्यांची मतमोजणी केंद्राला भेट

पुणे : विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी आज भारतीय अन्‍न महामंडळाच्‍या परिसरात उभारण्‍यात आलेल्‍या मतमोजणी केंद्राची, तसेच मीडिया सेंटरची भेट देऊन पहाणी केली. जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनीही मतमोजणी केंद्रातील आणि मिडीया सेंटर मधील सुविधांचा आढावा घेतला. 

डॉ. म्हैसेकर यांच्या समवेत उपायुक्‍त प्रताप जाधव, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते, तर जिल्हाधिकाऱ्यांसमवेत पोलीस उपायुक्‍त मितेश घट्टे, उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, दत्‍तात्रय कवितके, संजय देशमुख, पल्‍लवी घाटगे, विकास भालेराव आदी अधिकारी उपस्थित होते. पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्‍न महामंडळाच्‍या परिसरात होणार आहे.  


या नंतर डॉ. म्हैसेकर यांनी बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलला भेट देऊन मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राची पाहणी केली. मीडिया सेंटर व परिसरातील वेगवेगळ्या कक्षांना भेट देऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. या वेळी त्यांच्या समवेत निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे, उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZPQCA
Similar Posts
‘मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून मतदान प्रक्रिया पार पाडा’ पुणे : ‘भारत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून निवडणूक प्रक्रिया पार पाडावी,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्‍या.
‘निवडणूक कालावधीत बँकांनी आयोगाच्या सूचनांचे पालन करावे’ पुणे : ‘पुणे विभागातील सर्व बँकांनी निवडणूक कालावधीतील बँकिंग व्यवहार व उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण व देखरेख ठेवण्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
‘निवडणुकीचे काम करताना गोंधळून जाऊ नका’ पुणे : ‘निवडणुकीचे काम करताना गोंधळून जाऊ नका, तुमच्‍या कार्यक्षमतेवर आमचा विश्‍वास आहे, पण तुमचा स्‍वत:वर विश्‍वास असला पाहिजे,’ अशा शब्‍दांत विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा उत्‍साह वाढवला.
‘पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना प्राधान्याने सोई-सुविधा द्याव्यात’ पुणे : ‘आषाढी वारीच्यानिमित्ताने पालखी सोहळ्याच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात येणाऱ्या वारकऱ्यांना सर्व सोई-सुविधा प्राधान्याने देण्यात याव्यात,’ अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language